Posts

भारतीय परंपरा,सण आणि विज्ञान...

              भारतीय संस्कृती आणि आणि तिचे गोडवे ...गाऊ तेवढे थोडेच....निरनिराळ्या सणावाराला निरनिराळा उत्साह...  पूर्वीच्या परंपरा आणि त्या आजतागायत जशाच्या तशा टिकून आहेत ...जास्ती जास्त खेडोपाडी आणि छोट्या छोट्या वस्त्या...इथे फार उत्साहाने साजरे करताना पाहायला मिळतात.... सामाजिक ऐक्य आणि माणुसकीची जाणं....आशा प्रकारे गोडीगुलाबीने निरंतर चालत आलेले प्रेम....            वर्षाच्या सुरुवातीला *गुढीपाडवा* - या दिवशी सकाळी गुढीची पूजा करून ,कडुनिंबाची पाने गुळ घालून, वाटून प्रसाद म्हणून खातात...यामुळे रक्त शुद्ध होते....रोगप्रतिकार शक्ती वाढते...त्याचबरोबर जवळजवळ सर्व सणाला  पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. *वटपौर्णिमा* - या दिवशी  महिलांचा खूप उत्साह वाढतो...नटूनथटून सर्वजण एकत्र येऊन ,वडाच्या झाडाची पूजा करतात...आणि जन्मोजन्मी हाच पती मिळुदे म्हणून  मनोमन पूजा करतात.... *बैलपोळा* - हा सण साजरा करण्याचा  हेतू ... पूर्वीच्या काळात शेतातील कामाची सुरुवात होतं असत....त्या दिवशी मुक्या जनावरांना आं...

स्त्री शक्ती...

*घे उंच भरारी तू गं* *पाखरापरी या*, *तोडून पाश सारे* *जीवनगीत गाऊया*, *उमलून रोज नव्याने* *कळीचे फुल होऊया*, *सुगंध आपला या* *मानवतेला देऊया*, *जरी असले क्रूर हात* *तुला खुडून टाकणारे*, *लढण्यास सज्ज तू हो* *आदिशक्ती चे रूप घे*, *नजरेचा खेळ सारा* *दुनियेस मिळे इशारा*, *हास्य तुझे गाली* *फुलतो मोर पिसारा*, *सौंदर्य लाभले तुझं* *शाप म्हणू की वरदान*, *जन्म नारीचा असा* *साऱ्या जगी ती महान*. *जागतिक महिला दिनाच्या*  *खूप शुभेच्छा*🌹🙏 *.....पल्लवी माळी...*🌿🌹🙏

वसंत ऋतू...

हर्षे दाटतो मोद तो भरतो झुबकेदार फांद्यांवर मोहर बहरतो प्रमोद पसरे किलबिलाट सारी आनंदाने गाणे गाती कोकिळेची रंगत न्यारी शालू हिरवा नेसून निसर्ग तयार मनपाखरू मग हे प्रत्येक फुलांवर भिरभिरणार वसुंधरा ही मग खुदकन हसते लाल पिवळ्या पानांनी कांचना भासते शिशिर ऋतू जाता वसंताचा वेगळाच थाट विसरून क्षणात दुःखे सारी धरतो आपली वाट...         *~पल्लवी माळी*

हायकू...नवं अंकुर....

*....नवं अंकुर....* १)नवं अंकुर वसंतात फुलला मनाचा झुला २)नवं अंकुर मज स्वप्नांत भासे मोरांची पीसे ३)नवं अंकुर वाऱ्यासवे झुलते फुल फुलते ४)नवं अंकुर उदरात लपले शांत झोपले ५)नवं अंकुर पालवी छान फुले भुलून गेले ६)नवं अंकुर प्रेमाची नवी दिशा मज अपेक्षा ७)नवं अंकुर पहाटेचीच आशा नवीन दिशा ८)नवं अंकुर साद मनाची अशी कळेना कशी *-पल्लवी महादेव माळी..*

सावली...

हळुवारपणे गारवा असतो झुळकेसोबत वाऱ्याच्या क्षण जपावा अलगत आठवणीसवे सुखाच्या हळूहळू सरकते अशी किरणांची साथ तुटते असतो वारा साथीला वेळ हातातून सुटते सांजवेळी पुन्हा येतेच सगळीकडे अंधार घेऊन लपंडाव खेळते प्रकाशासवे जिंकेन एक दिवस म्हणून सावली नात्यांचीही असते तिथे अंधार पडतो अहंकाराचा माणुसकीची किरणे होता लुप्त खेळ चालतो भावनाशून्य मनांचा... कवयित्री~पल्लवी माळी..✍ मु/पो~अब्दुल लाट..

आयुष्याचा प्रवास....

Image
                जन्म होतो वेदनेचा प्रलय घेऊन माऊलीच्या हास्य अन अश्रूसोबत कुटुंबातील एक सदस्य नवीन पारावारा उरत नाही आनंदासोबत बागडणार मन अल्लड, निरागस सुखदुःखाची  भाषा समजू लागत ऊन सावली नात्यांची वेगळी अनुभवण्या वेळोवेळी ठेचकाळत कधी संधी हुलकावणी देऊन जाते कधी वेळचआपल्या बाजूने नसते परीक्षा मात्र सर्वच प्रकारच्या अशा गुणांचीच चाचणी अपुरी पडते आशा,अपेक्षा यांचा नसतो मेळ साऱ्या भूमिका पेलण्याचा खेळ आयुष्याचे टप्पे झेलत स्वतःच्या आठवणीत सुखावनं होत मागच्या जेव्हा रस्ता स्वतःचा तयार होतो तेव्हा आयुष्याची सांजवेळ असते हव्या वाटणाऱ्या सुंदर जीवनाची रंगीत तालीम डोळ्यांसमोरअसते प्रवास सुरू असतो वळणांचा वाटेत असणाऱ्या प्रत्येकांचा समोरासमोर येणं ऋणानुबंधाच सोबती बनणं आपल्या जीवलगांच... कवयित्री-पल्लवी महादेव माळी..✍

...मनतरंग..

प्रतिबिंब हे मनाचे जाणुनी घ्यावे.... आठवणीतून पुन्हा परतूनी यावे.... रंगीत सांज अन सुरुवात मंगलमय... नित्य सरते आहे आयुष्य आनंदमय.... पल्लवी....🤗