भारतीय परंपरा,सण आणि विज्ञान...
भारतीय संस्कृती आणि आणि तिचे गोडवे ...गाऊ तेवढे थोडेच....निरनिराळ्या सणावाराला निरनिराळा उत्साह... पूर्वीच्या परंपरा आणि त्या आजतागायत जशाच्या तशा टिकून आहेत ...जास्ती जास्त खेडोपाडी आणि छोट्या छोट्या वस्त्या...इथे फार उत्साहाने साजरे करताना पाहायला मिळतात.... सामाजिक ऐक्य आणि माणुसकीची जाणं....आशा प्रकारे गोडीगुलाबीने निरंतर चालत आलेले प्रेम....
वर्षाच्या सुरुवातीला *गुढीपाडवा* - या दिवशी सकाळी गुढीची पूजा करून ,कडुनिंबाची पाने गुळ घालून, वाटून प्रसाद म्हणून खातात...यामुळे रक्त शुद्ध होते....रोगप्रतिकार शक्ती वाढते...त्याचबरोबर जवळजवळ सर्व सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.
*वटपौर्णिमा* - या दिवशी महिलांचा खूप उत्साह वाढतो...नटूनथटून सर्वजण एकत्र येऊन ,वडाच्या झाडाची पूजा करतात...आणि जन्मोजन्मी हाच पती मिळुदे म्हणून मनोमन पूजा करतात....
*बैलपोळा* - हा सण साजरा करण्याचा हेतू ... पूर्वीच्या काळात शेतातील कामाची सुरुवात होतं असत....त्या दिवशी मुक्या जनावरांना आंघोळ घालून ..त्यांना स्वच्छ करून.... गळ्यातील कडा ,घुंगरू तसेच त्यांची टोकदार शिंग रंगीबेरंगी करून ....हा दिवस साजरा केला जातो...
*आषाढी एकादशी* - या दिवशी सारे भक्तगण विठुमाऊली च्या दर्शनासाठी येतात... विठ्ठल विठ्ठल नामजप धारण करून स्वतःला झोकून देऊन नामगजरात दंग होऊन जातात..कुठेतरी वाचनातून गेले आहे . विठ्ठल हा शब्द उच्चारल्यानंतर हार्टअँटॅक येत नाही...
*नागपंचमी* - हा सण खेडोपाडयात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो....या दिवशी महिला गळ्यात आणि पुरुष हातात दोरा बांधतात....आणि
सरपटणारे प्राणी दोऱ्याजवळ फिरकत नाहीत त्यांच्या दातात दोरा अडकुन इजा होऊ शकते...अजूनही काही ठिकाणी साप दिसला रे दिसला की तिथे छोटा कापडाचा तुकडा टाकतात...हा प्रकार खेड्यात नक्की पाहायला मिळतो....
*ईद*- या दिवशी सर्व मुस्लिम बंधू एकत्र येऊन गळाभेट घेतात...
खूप उत्साहाने हा सण साजरा करतात
*रक्षाबंधन*- भाऊबहिण यांचं नात कायमस्वरूपी टिकून राहावं...त्यांच्यासाठी हा दिवस फार मोलाचा...
त्याचबरोबर *नारळी पौर्णिमा* , *गणेश चतुर्थी* , *घटस्थापना* *विजयादशमी*, *भूमिपूजन* , *लक्ष्मी कुबेर पूजन*, *भाऊबीज* , *तुलसी विवाह* , *नाताळ* , *हुताशनी पौर्णिमा*
असे अनेक सण भारतात सर्वत्र पार पडतात...प्रत्येक सण साजरा होतो तो काहीतरी वैज्ञानिक कारण घेऊन पार पडतो...भारतीय परंपरा कायम जपून ठेवली जाते ... सणाला नव्याने जगणारे आपले भारतीय आहेत .....म्हणूनच सामाजिक बांधिलकी जपून ठेवली जाते...🙏
*..पल्लवी माळी....*🌿
Comments
Post a Comment