Posts

Showing posts from April, 2019

आयुष्याचा प्रवास....

Image
                जन्म होतो वेदनेचा प्रलय घेऊन माऊलीच्या हास्य अन अश्रूसोबत कुटुंबातील एक सदस्य नवीन पारावारा उरत नाही आनंदासोबत बागडणार मन अल्लड, निरागस सुखदुःखाची  भाषा समजू लागत ऊन सावली नात्यांची वेगळी अनुभवण्या वेळोवेळी ठेचकाळत कधी संधी हुलकावणी देऊन जाते कधी वेळचआपल्या बाजूने नसते परीक्षा मात्र सर्वच प्रकारच्या अशा गुणांचीच चाचणी अपुरी पडते आशा,अपेक्षा यांचा नसतो मेळ साऱ्या भूमिका पेलण्याचा खेळ आयुष्याचे टप्पे झेलत स्वतःच्या आठवणीत सुखावनं होत मागच्या जेव्हा रस्ता स्वतःचा तयार होतो तेव्हा आयुष्याची सांजवेळ असते हव्या वाटणाऱ्या सुंदर जीवनाची रंगीत तालीम डोळ्यांसमोरअसते प्रवास सुरू असतो वळणांचा वाटेत असणाऱ्या प्रत्येकांचा समोरासमोर येणं ऋणानुबंधाच सोबती बनणं आपल्या जीवलगांच... कवयित्री-पल्लवी महादेव माळी..✍

...मनतरंग..

प्रतिबिंब हे मनाचे जाणुनी घ्यावे.... आठवणीतून पुन्हा परतूनी यावे.... रंगीत सांज अन सुरुवात मंगलमय... नित्य सरते आहे आयुष्य आनंदमय.... पल्लवी....🤗