सावली...

हळुवारपणे गारवा असतो
झुळकेसोबत वाऱ्याच्या
क्षण जपावा अलगत
आठवणीसवे सुखाच्या

हळूहळू सरकते अशी
किरणांची साथ तुटते
असतो वारा साथीला
वेळ हातातून सुटते

सांजवेळी पुन्हा येतेच
सगळीकडे अंधार घेऊन
लपंडाव खेळते प्रकाशासवे
जिंकेन एक दिवस म्हणून

सावली नात्यांचीही असते
तिथे अंधार पडतो अहंकाराचा
माणुसकीची किरणे होता लुप्त
खेळ चालतो भावनाशून्य मनांचा...

कवयित्री~पल्लवी माळी..✍
मु/पो~अब्दुल लाट..

Comments