हायकू...नवं अंकुर....


*....नवं अंकुर....*

१)नवं अंकुर
वसंतात फुलला
मनाचा झुला

२)नवं अंकुर
मज स्वप्नांत भासे
मोरांची पीसे

३)नवं अंकुर
वाऱ्यासवे झुलते
फुल फुलते

४)नवं अंकुर
उदरात लपले
शांत झोपले

५)नवं अंकुर
पालवी छान फुले
भुलून गेले

६)नवं अंकुर
प्रेमाची नवी दिशा
मज अपेक्षा

७)नवं अंकुर
पहाटेचीच आशा
नवीन दिशा

८)नवं अंकुर
साद मनाची अशी
कळेना कशी


*-पल्लवी महादेव माळी..*

Comments