वसंत ऋतू...
हर्षे दाटतो
मोद तो भरतो
झुबकेदार फांद्यांवर
मोहर बहरतो
प्रमोद पसरे
किलबिलाट सारी
आनंदाने गाणे गाती
कोकिळेची रंगत न्यारी
शालू हिरवा
नेसून निसर्ग तयार
मनपाखरू मग हे
प्रत्येक फुलांवर भिरभिरणार
वसुंधरा ही मग
खुदकन हसते
लाल पिवळ्या पानांनी
कांचना भासते
शिशिर ऋतू जाता
वसंताचा वेगळाच थाट
विसरून क्षणात दुःखे सारी
धरतो आपली वाट...
*~पल्लवी माळी*
Comments
Post a Comment