स्त्री शक्ती...
*घे उंच भरारी तू गं*
*पाखरापरी या*,
*तोडून पाश सारे*
*जीवनगीत गाऊया*,
*उमलून रोज नव्याने*
*कळीचे फुल होऊया*,
*सुगंध आपला या*
*मानवतेला देऊया*,
*जरी असले क्रूर हात*
*तुला खुडून टाकणारे*,
*लढण्यास सज्ज तू हो*
*आदिशक्ती चे रूप घे*,
*नजरेचा खेळ सारा*
*दुनियेस मिळे इशारा*,
*हास्य तुझे गाली*
*फुलतो मोर पिसारा*,
*सौंदर्य लाभले तुझं*
*शाप म्हणू की वरदान*,
*जन्म नारीचा असा*
*साऱ्या जगी ती महान*.
*जागतिक महिला दिनाच्या*
*खूप शुभेच्छा*🌹🙏
*.....पल्लवी माळी...*🌿🌹🙏
Comments
Post a Comment