आयुष्याचा प्रवास....
जन्म होतो वेदनेचा प्रलय घेऊन
माऊलीच्या हास्य अन अश्रूसोबत
कुटुंबातील एक सदस्य नवीन
पारावारा उरत नाही आनंदासोबत
बागडणार मन अल्लड, निरागस
सुखदुःखाची भाषा समजू लागत
ऊन सावली नात्यांची वेगळी
अनुभवण्या वेळोवेळी ठेचकाळत
कधी संधी हुलकावणी देऊन जाते
कधी वेळचआपल्या बाजूने नसते
परीक्षा मात्र सर्वच प्रकारच्या अशा
गुणांचीच चाचणी अपुरी पडते
आशा,अपेक्षा यांचा नसतो मेळ
साऱ्या भूमिका पेलण्याचा खेळ
आयुष्याचे टप्पे झेलत स्वतःच्या
आठवणीत सुखावनं होत मागच्या
जेव्हा रस्ता स्वतःचा तयार होतो
तेव्हा आयुष्याची सांजवेळ असते
हव्या वाटणाऱ्या सुंदर जीवनाची
रंगीत तालीम डोळ्यांसमोरअसते
प्रवास सुरू असतो वळणांचा
वाटेत असणाऱ्या प्रत्येकांचा
समोरासमोर येणं ऋणानुबंधाच
सोबती बनणं आपल्या जीवलगांच...
कवयित्री-पल्लवी महादेव माळी..✍

Wa khup mst aahe like 😍 😍 🌹🌹
ReplyDeleteमनस्वी धन्यवाद..🙏🌹
Deleteअरे वाह... खूप छान...
ReplyDeleteमनस्वी धन्यवाद..🌹🌹
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete